‘ही सत्तेसाठी द्वेषाने पछाडलेली मंडळी…’ राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधकांसह एका नेत्यावर घणाघात
नव्या संसद भवनाचं उद्धाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत नसल्याने या उद्गाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यात ठाकरे गटानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून टीका करण्यात आली होती. त्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरोधकांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.
अहमदनगर : रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन झालं आहे. नव्या संसद भवनाचं उद्धाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत नसल्याने या उद्गाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यात ठाकरे गटानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून टीका करण्यात आली होती. त्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरोधकांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष शिल्लक राहिला नाही. सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्वाचे तत्व सोडलं असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली. त्यामुळे मान्यता संपत चालल्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र येऊन काहीही फरक पडणार नाही. तर ठाकरे आणि पवार यांच्यासह विरोधक हे सत्तेसाठी द्वेषाने पछाडलेली मंडळी असल्याचा टोला त्यांनी लगावला. मात्र देशातील जनता मोदींच्या मागे आहे. येत्या 2024 ला 2019 चे मागील रेकॉर्ड तोडून अधिक जागा जिंकत भाजप सत्तेत येणार असल्याचेही ते म्हणाले.