भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका; म्हणाला, ‘आता केवळ त्यांचचं कुटुंब शिल्लक…’
शिवसेना फुटल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट तयार झाला आहे. तर सध्या शिंदे गट आणि अजित पवार गट हा सत्तेत सहभागी आहे. यावरून ठाकरे गटासह शरद पवार गटाकडून भाजपवर सतत टीका होताना दिसत असते.
अहमदनगर, 01 ऑगस्ट 2023 | राज्यात महत्वाचे असे असणारे दोन पक्ष आज फुटले आहेत. या दोन्ही पक्षात फुट पडल्याने दोन दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेना फुटल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट तयार झाला आहे. तर सध्या शिंदे गट आणि अजित पवार गट हा सत्तेत सहभागी आहे. यावरून ठाकरे गटासह शरद पवार गटाकडून भाजपवर सतत टीका होताना दिसत असते. यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार गटावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी विखे पाटील यांनी, माझं कुटुंब माझी जबाबदारीमध्ये शिवसेना कधी कुटुंबाच्या पलीकडे गेलेच नाही. आता केवळ त्यांचं कुटुंब शिल्लक राहिले आहे. राष्ट्रवादीची देखील तशीच अवस्था आहे. त्यामुळे उरले सुरलेले मावळे आपल्या सोबत राहिले पाहिजे म्हणून उसने अवसान आणून टीका करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असं विखे पाटील यांनी म्हंटलंय.