Chandrashekhar Bawankule | 'त्या' व्हायरल पोस्टवरून बावनकुळे हटके बॅटींग, म्हणाले...

Chandrashekhar Bawankule | ‘त्या’ व्हायरल पोस्टवरून बावनकुळे हटके बॅटींग, म्हणाले…

| Updated on: Apr 12, 2023 | 7:26 AM

व्हायरल पोस्टवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी या अशा पोस्ट पेरल्या जात आहेत असे म्हटलं आहे. 18 तास काम करणारे शिंदे सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत

मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याच्या राजकारणातील मोठं नाव. कधी काळी विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहीलं आणि आता महसुलमंत्री आहेत. याचवेळी त्यांची मुख्यमंत्री संदर्भातील पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतं आहेत. त्या व्हायरल पोस्टवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी या अशा पोस्ट पेरल्या जात आहेत असे म्हटलं आहे. 18 तास काम करणारे शिंदे सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. 18 तास रस्त्यावर फिरणारा, 18 तास जनतेमध्ये रंगनारा कार्यकर्ता, हिंदुत्वाचा विचार करणारा कार्यकर्ता, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन फिरणारा कार्यकर्ता हा कार्यकर्ता राज्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे. तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे ही जोडी बांधावर जाऊन काम करत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 12, 2023 07:26 AM