Radhakrishna Vikhe Patil : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना न्यायालयाचा दे धक्का; दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Radhakrishna Vikhe Patil : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना न्यायालयाचा दे धक्का; दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

| Updated on: Apr 12, 2023 | 10:31 AM

2004 साली शेतकऱ्यांच्या बेसल डोसच्या नावाखाली बँकाकडून 5 कोटी 76 लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र हे शासनाच्या कर्ज माफी योजनेत बसवून चुकीच्या मार्गाने हे सर्व कृत्य केल गेल

अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राहाता न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना कर्जमाफी प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी करावी असे आदेशच राहता न्यायालयाने दिले आहेत. यावरून अहमदनगरसह राज्याच्या राजकारणात खडबळ उडाली आहे. तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करावी अशी मागणी प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू यांनी केली आहे. 2004 साली शेतकऱ्यांच्या बेसल डोसच्या नावाखाली बँकाकडून 5 कोटी 76 लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र हे शासनाच्या कर्ज माफी योजनेत बसवून चुकीच्या मार्गाने हे सर्व कृत्य केल गेल. या कर्जावरील 5 कोटी रूपये व्याजापोटी कारखाना सभासद आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचेही कडू यांनी सांगितलं.