ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलीसांच्या अडीच तास झुंजीला यश; अखेर परिस्थिती नियंत्रणात
हिदुत्ववादी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जमावानं कायदा हातात घेत गंजी गल्लीवर धावा केला. घरे, दुकानांवर दगड फेक करत उद्मात करण्यात आला. यावरून पोलिसांनी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा केला.
कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर शहरात व्हायरल मेसेजवरुन सुरू झालेला वाद आज आंदोलनावेळी चिघळला. हिदुत्ववादी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जमावानं कायदा हातात घेत गंजी गल्लीवर धावा केला. घरे, दुकानांवर दगड फेक करत उद्मात करण्यात आला. यावरून पोलिसांनी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा केला. तब्बल अडीच तास झुंज देत शहरात चिघळलेली स्थिती पुर्व पदावर आणली. सध्या येथे शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तर सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 19 तारखेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच अनावश्यक घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी देखील शांततेचं आवाहन केलं आहे.