महाराष्ट्र हितासाठी सावधान! धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करणारे, सत्ता भोगणारे वावरत आहेत; सामनातून सरकारवर निशाना
यावेळी भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावं! असं म्हटलं आहे.
मुंबई : राज्यात होतच असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाचे मुख्यपत्र असणाऱ्या दैनिक सामानामधून शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यावेळी भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावं! असं म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसत असल्याचा घणाघता करण्यात आला आहे. तर दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. विदर्भातील अकोला येथे शनिवारी दोन गटांत दंगलीचा भडका उडाला. किरकोळ वादातून हाणामारी व त्यातून दंगलीची आग भडकली. ही दंगल हाताळण्यात पोलीस कमी पडले.