त्र्यंबकेश्वर घटनेवर हिंदू महासभा आक्रमक? ”त्या” घटनेनंतर मंदिरात जात करणार ”ही” कृती
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शनिवारी रात्री इतर धर्मियांनी बळजबरीने मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचं असं काही जणाचं म्हणणं आहे. तर संदलमधील धूप दाखवलं नाही तर काही लोकांनी मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वारावर आत घुसल्याचा आरोप केला जातोय.
नाशिक : राज्याच्या काही जिल्ह्यात सध्या दंगली उसळत आहेत. त्यामध्येच त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात देखिल धार्मिक तेड निर्माण करण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शनिवारी रात्री इतर धर्मियांनी बळजबरीने मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचं असं काही जणाचं म्हणणं आहे. तर संदलमधील धूप दाखवलं नाही तर काही लोकांनी मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वारावर आत घुसल्याचा आरोप केला जातोय. यावरून ब्राह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाची राज्य शासनाकडून देखील दखल घेण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे देखील आदेश आहेत. मात्र आता हे प्रकऱण वेगळ्या वळणावर जात आहे. येथे आता याप्रकरणात हिंदु महासभेने उडी घेतली आहे. तर महासभेकडून मंदिराचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. तसेच पुजणदेखील करण्यात येईल. यावेळी पुणे आणि नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.