टोलनाका तोडफोड प्रकरणावरून रोहित पवार यांचा सल्ला; म्हणाले, “अमित ठाकरे यांनी लोकशाही मार्गानं…”
सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला, म्हणून समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. मनसेच्या या कृतीवरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांनी सल्ला दिला आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला, म्हणून समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. मनसेच्या या कृतीवरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांनी सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “अमित ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. ते युवा नेता आहेत. माझं त्यांना एवढेच म्हणणं आहे की टोलनाके तोडण्याआधी त्यांनी एकदा तरी विचार करावा की आपल्याला भविष्यामध्ये लोकांना काय द्यायचं आहे. भाजप जर अशा पद्धतीने टीका करत असेल तर ती त्यांना टार्गेट करतेय, असं माझं म्हणणं आहे. पण अमित ठाकरे यांनी देखील या सगळ्या तोडफोडीबद्दल एकदा तरी विचार करायला हवा. अमित ठाकरे यांनी लोकशाही मार्गाने निषेध करावा.”