एमआयडीसीवरून घमासान, रोहित पवार करणार राम शिंदे यांचा शाल देऊन सत्कार; पाहा व्हिडीओ…
कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी उभी रहावी आणि रोजगार निर्मीतीसाठी आमदार रोहित पवार आग्रही आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीसाठी भर पावसात रोहित पवार यांनी आंदोलनही केलं होतं.
मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी उभी रहावी आणि रोजगार निर्मीतीसाठी आमदार रोहित पवार आग्रही आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीसाठी भर पावसात रोहित पवार यांनी आंदोलनही केलं होतं. दुसरीकडे सध्या याच एमआयडीसीवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील राजकारण तापलं आहे. रोहित पवार बोलताना म्हणाले की, “मी शाल घेऊन आलोय. मी राम शिंदे यांचा सत्कार करणार आहे. कारण मी तरूणांना काम मिळावे म्हणून मनापासून प्रयत्न करत आहे. तर आणि राम शिंदे MIDC येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. ग्रामसभेचा ठराव वाचला तर गावकऱ्यांनी काही भिती व्यक्त केली आहे. एका गावकऱ्याने सांगितले की, केमिकल इंडस्ट्री येणार पण अस नाही. त्यातील एक जण म्हणाला आपली घर घेणार शेती घेणार तर असं काही नाही. उच्चशिक्षित तसेच जे शिकले नाहीत त्यांना सुद्धा काम मिळेल. अनेक माध्यमातून कामे मिळतील. त्यांचा तिकडे विरोध संपला. अधिकारी येतात आणि ग्रामस्थांशी चर्चा करतात हे त्यांना समजले. पण शिंदे प्रोफेसर असून त्यांना ते समजत नाही.”