“उद्योगमंत्र्यांनी फसवणूक केली”, कर्जत जामखेड MIDC मुद्द्यावरून रोहित पवार पुन्हा आक्रमक!
कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. उद्योग मंत्री यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने फसवणूक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
मुंबई,26 जुलै 2023 | कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील अमआयडीसीचा मुद्दा, बेरोजगारांना रोजगाराची संधी यावरून रोहित पवार यांनी भर पावसात विधान भवनाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन केले होते. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागं घेतलं होतं. उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज बैठक झाली नसल्यानं रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी ट्वीट करत नेमकी काय आरोप केले यासाठी पाहा हा व्हिडीओ..
Published on: Jul 26, 2023 09:13 AM
Latest Videos