पुड्या सोडू नका खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत; रोहित पवार, राम शिंदे पुन्हा आमने-सामने

पुड्या सोडू नका खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत; रोहित पवार, राम शिंदे पुन्हा आमने-सामने

| Updated on: Oct 29, 2022 | 4:04 PM

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या दोन आमदारांच्या आरोप-प्रत्यारोपानं सध्या राज्याचं राजकारण तापलं असतानाच आता आणखी एक आजी -माजी आमदार आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

अहमदनगर : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या दोन आमदारांच्या आरोप-प्रत्यारोपानं सध्या राज्याचं राजकारण तापलं असतानाच आता आणखी एक आजी -माजी आमदार आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. मतदारसंघात येऊ नका म्हणून तानाजी सावंत यांना रोहित पवार यांनी दहा फोने केले होते असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. राम शिंदे यांच्या आरोपांना ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी मंत्री तानाजी सावंत यांना देखील टोला लगावला आहे.

‘ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहीत नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका , ‘खेकड्या’ची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरुर बोलवा…मग मैदाननात बघू!’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. आता रोहित पवार यांच्या टीकेला राम शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Oct 29, 2022 04:04 PM