मुंबईला न्याय मिळतो मात्र संपूर्ण महाराष्ट्राला मिळत नाही
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असेल किंवा त्यांना मिळणारी मदत असेल याबाबत सरकारकडून दुजेभाव केला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात जे भाजप शिवसेना सरकार आले आहे, त्या सरकारकडून राज्यासाठी एक आणि मुंबईसाठी एक असा निर्णय घेतला जातो आहे. त्यामुळे राज्यावर त्याचा विपरित परिणाम होतो अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. सध्या राज्यात ओला दुष्काळ परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करताना सरकार वेगळा विचार करते तर मुंबईसाठी मात्र मदत करताना भरघोस मदत केली जाते त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असेल किंवा त्यांना मिळणारी मदत असेल याबाबत सरकारकडून दुजेभाव केला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
Published on: Aug 22, 2022 11:57 AM
Latest Videos