सरकारमध्ये कोणीही असो, घोषणा नको तर कर्तृत्व दाखवा, रोहित पवार यांची टीका

“सरकारमध्ये कोणीही असो, घोषणा नको तर कर्तृत्व दाखवा”, रोहित पवार यांची टीका

| Updated on: Jun 06, 2023 | 2:01 PM

आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. या साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले आहेत.रायगड किल्यावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर भाष्य केलं.

रायगड : सगळे राजकीय पुढारी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांची नावे घेतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या जतन, संवर्धनासाठी कोणी काहीच पावलं उचलत नाही. त्यात आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले होते. रायगडावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देखील उपस्थित झाले. यावेळी त्यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर भाष्य केलं. “सरकार कोणाचंही असो, पण शिवभक्त म्हणून एकच सांगेन कुठेतरी योग्य असं प्लानिंग व्हायला पाहिजे. उगाच दहा-पंधरा वर्ष एकच भिंत बांधत बसू नये.शिवभक्तांचे नियोजन,संग्राहलय यांची व्यवस्था केली पाहिजे. घोषणा करण्यापेक्षा सरकारने कर्तृत्व दाखवलं पाहिजे. कुठेतरी विकास दिसला पाहिजे.तसेच केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने जलद गतीने काम केलं पाहिजे”, असं रोहित पवार म्हणाले.

Published on: Jun 06, 2023 02:01 PM