नाशिक पदवीधर निवडणूक, सत्यजीत तांबेंचं बंड, अन् भाजपची भूमिका; रोहित पवार म्हणाले…
नाशिक पदवीधर निवडणूक आणि सत्यजीत तांबे यांची उमेदवारी यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यावर रोहित पवार बोलले आहेत पाहा...
नाशिक पदवीधर निवडणूक आणि सत्यजीत तांबे यांची उमेदवारी यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही, यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होतंय. भाजपने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत त्यामध्ये शिंदे गटाला कुठेही न्याय मिळाला नाही याचाच अर्थ असा आहे की कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल याची खात्री भाजपला असल्याने शिंदे गटाला डावललं जातंय का..?, असं रोहित पवार म्हणालेत.
Published on: Jan 22, 2023 03:35 PM
Latest Videos