“पक्ष अन् चिन्ह गेलं, पण आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागणार!”
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाचा निकाल आणि आमदार अपात्रतेच्या निकालावर भाष्य केलंय.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. पक्ष आणि चिन्ह शिंदेगटाला मिळालं. त्यानंतर यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाचा निकाल आणि आमदार अपात्रतेच्या निकालावर भाष्य केलंय. “सध्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदेगटाला मिळालं आहे. पण 21 फेब्रुवारीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागेल. आताच्या या निर्णयामुळे विधानसभा पोटनिवडणुकीवर कोणता ही फरक पडणार नाही. कारण 21 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं निलंबन केलं. तर परिस्थिती बदलू शकते”, असं रोहित पवार म्हणालेत. “राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा जेव्हा गुजरात आणि हरियाणा यांच्या निवडणुका एकत्रित होत्या. तेव्हा पंतप्रधान मोदी साहेबांना दोन्हीकडे एकाचवेळी प्रचार करता येणार नव्हता. तेव्हा आयोगाने दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या होत्या. यावरूनच आयोग कोणाचं ऐकत हे लक्षात येतं”, असंही रोहित म्हणालेत.