रोहित पवार यांची राजकीय फटकेबाजी, 'आम्ही खेळू तेव्हा अख्खं स्टेडियम...'

रोहित पवार यांची राजकीय फटकेबाजी, ‘आम्ही खेळू तेव्हा अख्खं स्टेडियम…’

| Updated on: Oct 07, 2023 | 11:46 PM

अजित पवार यांना पुन्हा कधी तरी मुख्यमंत्री करू असंच ते म्हणणार. आताच मुख्यमंत्री करू, आताच न्याय मिळवून देऊ, आताच मृत रुग्णांना मदत करू, असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असत. आज भुजबळ काहीही बोलतील, पण त्यांनी हे विसरू नये की पवार साहेबांनी त्यांनाच अनेक मंत्री पद दिली आहेत.

पुणे : 7 ऑक्टोबर 2023 | पुण्यामध्ये 27 वर्षानंतर विश्वचषकाचे क्रिकेटचे सामने होणार आहेत. पुण्याच्या गहुंजे मैदानावर अंतिम टप्प्यात तयारी आलीय. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार हे स्वतः यावर लक्ष देत आहेत. क्रिकेटच्या मैदानात उतरलेले राजकीय रोहित पवार यांनी यावेळी क्रिकेटच्या भाषेत राजकीय प्रश्नांना उत्तरे दिलीत. आजवर पवार साहेबांनी अनेकांना मंत्री पद दिली. अधिकार दिले. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही. पण, आज ते विरोधी गटात स्वार्थासाठी गेले आणि तिथं जाऊन म्हणतात पवार साहेब आमचं चालू देत नव्हते. पवार साहेब हे हुकूमशाही पद्धतीने काम करतात असे म्हणणे हे अशोभनीय आहे. आमच्या समोर त्यांची टीम आली तर आम्ही मैदानात उतरणार आहोतच. आमचा कॅप्टन एकच आहे. पण, समोरच्या टीमला तीन कॅप्टन आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा खेळू तेव्हा अख्खं स्टेडियम टाळ्या वाजवेल असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Published on: Oct 07, 2023 11:46 PM