“शिंदे-फडणवीसांची जय-वीरूसारखी मैत्री असेल तर स्वागतच”, रोहित पवारांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी जय-वीरु सारखी असून ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं, असं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलं होतं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या जाहिरातीमुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमची जोडी जय-वीरु सारखी असून ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं, असं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिंदे आणि फडणवीस दोघांनी मिठी मारावी, एकत्र बसावं,एकमेकांना जेवायला बोलवावं. हे करत असताना सामान्य लोकांचे प्रश्न सोडविले पाहिजे. जय-वीरूसारखी दोस्ती असेल तर चांगली गोष्ट आहे, त्यांचे स्वागत केल पाहिजे. जय-वीरू एका पिच्चर मध्ये होते आणि राज्यातही पिच्चरच सुरू आहेत”, असं रोहित पवार म्हणाले.
Published on: Jun 16, 2023 09:38 AM
Latest Videos