हेमंत रासने यांना उमेदवारी, रोहित टिळक यांच्याकडून नाराजी व्यक्त, पाहा...

हेमंत रासने यांना उमेदवारी, रोहित टिळक यांच्याकडून नाराजी व्यक्त, पाहा…

| Updated on: Feb 06, 2023 | 1:02 PM

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी आपली प्रतिक्रिया केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर मुक्ता टिळक यांचे पुतणे आणि काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी आपली प्रतिक्रिया केली आहे. घरातील सदस्य गेल्यानं मी उमेदवारी मागितली नाही. ते बरोबर दिसलं नसतं. मात्र भाजपनं घरात उमेदवारी द्यायला हवी होती. भाजपने असं का केलं माहिती नाही. पण याचे पडसाद दिसतील. ब्राम्हण समाजात नाराजी आहे, असं रोहित टिळक म्हणालेत. शिवाय मी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे, अशी प्रतिक्रियाही रोहित टिळक यांनी दिली आहे.

Published on: Feb 06, 2023 01:02 PM