‘अजित दादांच्या पोटात काहीच राहत नाही’; शिंदे गटाच्या मंत्र्याची खोचक प्रतिक्रिया

‘अजित दादांच्या पोटात काहीच राहत नाही’; शिंदे गटाच्या मंत्र्याची खोचक प्रतिक्रिया

| Updated on: Jun 22, 2023 | 3:38 PM

आपण गेल्या 1 वर्षापासून विरोधी पक्षनेतेपदावर काम केलं. पण आता या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली. तसेच पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. रिझल्ट दाखवतो असेही ते म्हणाले.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळाव्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना मोठा बॉम्ब टाकला. ज्यामुळे सध्या राष्ट्रवादीत सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांनी आपण गेल्या 1 वर्षापासून विरोधी पक्षनेतेपदावर काम केलं. पण आता या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली. तसेच पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. रिझल्ट दाखवतो असेही ते म्हणाले. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानेच ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी यावरून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित दादा बऱ्याच दिवसांपासून नाराज आहे. हे त्यांच्या बोलण्यात स्पष्ट होत होतं. तर सुप्रिया सुळे यांना जे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं त्यावरूनच ते आता नाराज झाले आहेत. त्यांना ही कदाचित कार्यकारी अध्यक्ष व्हायचं असेल. पण हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. मात्र दादांच्या पोटात काही राहत नाही. ते त्यांच्या ओठावर येतच असा टोला भुमरे यांनी लगावला आहे.

Published on: Jun 22, 2023 03:38 PM