कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची मंत्री पदावरून हाकालपट्टी करा; सत्तारांच्या वक्तव्यावरून राजकीय गटाची मागणी
शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याने टीकेची झोड पहायला मिळत आहे
मुंबई : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. यादरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. अशा वेळी शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याने टीकेची झोड पहायला मिळत आहे. सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर राज्यातील RPI खरात गटाने त्यांची अब्दुल सत्तारांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. पहा काय मागणी केली सचिन खरात यांनी.
Published on: Mar 13, 2023 08:00 AM
Latest Videos