बच्चू कडूंचा ट्रेलर फ्लॉप, थोडा तरी स्वाभिमान जिवंत ठेवा... कुणी दिला हा सल्ला?

बच्चू कडूंचा ट्रेलर फ्लॉप, थोडा तरी स्वाभिमान जिवंत ठेवा… कुणी दिला हा सल्ला?

| Updated on: Nov 03, 2022 | 4:10 PM

1 तारखेला ट्रेलर, 15 दिवसांनी पिक्चर दाखवणार आहेत. ट्रेलर फ्लॉप झाला आहे, अशी टीका सचिन खरात यांनी केली.

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वतः सांगितलं. मी एक फोन केला आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) गुवाहटीला आले…. या वक्तव्याला बच्चू कडू यांनी उत्तर दिलंच नाही. माझा निर्णय कार्यकर्ते घेत असतात, असे म्हणणाऱ्या बच्चू कडू यांचा १ तारखेचा ट्रेलर आणि पिक्चर दोन्ही फ्लॉप झाले आहेत. मात्र त्यांनी थोडा तरी स्वाभिमान जिवंत ठेवावा असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ रवी राणा यांनी घरात येऊन मारहाणीची भाषा केली आहे. माझा निर्णय कार्यकर्ता घेत असतो. त्यासाठी सभा घेणार म्हणाले..1 तारखेला ट्रेलर, 15 दिवसांनी पिक्चर दाखवणार आहेत. ट्रेलर फ्लॉप झाला आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यालाही त्यांनी उत्तर दिलेलं नाही… असा टोमणा सचिन खरात यांनी लगावला आहे.

Published on: Nov 03, 2022 04:08 PM