Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत

Mohan Bhagwat : शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा – मोहन भागवत

| Updated on: Mar 30, 2025 | 12:57 PM

RSS Mohan Bhagwat News : नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारीत इमारतीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत देखील उपस्थित होते.

शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा आहे. आपल्या समाजात दृष्टीहिनांना उपचार मिळावेत. नेत्रहिनांची समस्या राहावी हे समाजाला शोभत नाही. हा समाज माझा आहे. त्यामुळे समाजाच्या सामर्थ्यसाठी जे काही करायचे ते करत राहील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हंटलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारीत इमारतीची पायाभरणी केली. या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत बोलत होते.

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, प्रामाणिकपणे, तनमन धनाने आणि श्रद्धेने. संघाचे कार्यकर्ते अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते याच प्रेरणेने. आज सर्वच क्षेत्रात सेवा सुरू आहे. छोट्या मोठ्या प्रकल्प आणि उपक्रमात दीड लाखाहून अधिक समाजासाठी काम सुरू आहे. याच प्रेरणेतून हे काम सुरू आहे. हीच प्रेरणा आहे. स्वयंसेवक स्वत:साठी काहीच हाव ठेवत नाही. सर्वांसाठी काम करत आहेत. बदल्यात त्यांना काहीच हवे नाही. ते काम करत आहेत. समाजानेही स्वयंसेवकांच्या कामाची कदर केली. त्यामुळेच संघ स्वयंसेवक पुढे जात आहे, असं भागवत यांनी सांगितलं.
दया भावनेने हे सेवेचे काम चालत नाही. समाजाप्रती प्रेम आहे. वास्तावात समाजातील सर्वांना दृष्टी द्यायची आहे. सदा सर्वदा जीवनात जी दृष्टी आवश्यक आहे. जीवनात परिस्थिती नुसार जे काही मिळालं आहे, त्या परिस्थितीचा चांगला उपयोग करून आपल्या जीवनाला सार्थक बनवणे आणि निरायम बनवण्यासाठी जीवनाची जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी आहे. त्याचं वर्णन म्हणजे सेवा. हेच जीवन सूत्र आहे. एक तास शाखेत संघाच्या शाखेत स्वयं विकास आणि २३ तास समाजाची सेवा. याचदृष्टीने हे काम सुरू असतं. असचं काम सुरू राहील. काम करणाऱ्यांचा भावही हाच राहणार आहे, असा विश्वास यावेळी मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

Published on: Mar 30, 2025 12:57 PM