Dombivli News : दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; अल्पसंख्यांकांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन
Dombivli RSS Meeting : आरएसएसच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीनंतर डोंबिवलीमध्ये आरएसएस कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत. याच संदर्भात अप्पा दातार चौकात एक सभा घेण्यात आली आहे.
डोंबिवलीमधील आरएसएस शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर आरएसएसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. डोंबिवली मधील अप्पा दातार चौकात आरएसएस कार्यकर्त्यांची सभा झाली आहे. दगडफेक प्रकरणानंतर ही सभा झाली आहे. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले. याठिकाणी लहान मुलांना शिक्षण देण्यात येत असताना दगडफेक झाली होती. या घटनेनंतर काल अप्पा दातार चौकात सभा झाली. या सभेत सगळे आर्थिक व्यवहार हिंदू व्यापऱ्यांशीच करायचे अशा सूचना देण्यात आल्या. अल्पसंख्यांकांवर आर्थिक बहिष्कार टाकण्यात यावा असंही यावेळी आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे डोंबिवलीत तणावपूर्ण वातावरण बघायला मिळत असून पोलीस प्रशासन सतर्क आहे.
Published on: Mar 17, 2025 03:02 PM