Kalyan Shivsena : ‘शिव्या देतो…माझ्या छातीला…’, गंभीर आरोप करत शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून बेदम चोप

| Updated on: Mar 25, 2025 | 11:00 AM

भर रस्त्यामध्ये झालेल्या या राड्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा आहे. दरम्यान, महिला कार्यकर्ती राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यात उद्घाटन कार्यक्रमावरून हा राडा झाला असून प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं.

कल्याणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कल्याणमध्ये माजी नगरसेवकाला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्या. यावेळी या महिला कार्यकर्त्याकडून पोलिसांना एक निवेदन देण्यात आलं आणि त्यांच्याकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्याच्या भूमीपूजनावरून महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांच्याकडून मोहन उगले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील श्रेयवादाची लढाई आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याने कल्याणमध्ये या राड्याची एकच चर्चा होताना दिसतेय. दरम्यान, कल्याणमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयवादावरून पदाधिकाऱ्यांमध्ये नुकताच वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. भर रस्त्यात महिला कार्यकर्त्या राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यात चांगलाच राडा झाला होता. या दोघांत उद्घाटन कार्यक्रमावरून वाद झाल्याचे काल समोर आले होते. त्यानंतर आता प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं आहे.

Published on: Mar 25, 2025 11:00 AM
Dharavi Blast : धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा लागोपाठ भीषण स्फोट, क्षणार्धात सगळं भस्मसात अन् …
Kunal Kamra : कुणाल कामराची माफी नाहीच… शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?