धरण फुटल्याच्या अफवेने नागरिकांची धावधाव; प्रशासनाची पळापळ..., पण; नेमकं काय झालं धरणाच्या आफेवरून

धरण फुटल्याच्या अफवेने नागरिकांची धावधाव; प्रशासनाची पळापळ…, पण; नेमकं काय झालं धरणाच्या आफेवरून

| Updated on: Jul 24, 2023 | 7:39 AM

कुणी म्हटले राजुरा धरण फुटले तर कुणी म्हटले कोरहाळा धारण फुटले आणि हे धरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केलीय होती. तर शहरातील नागरिक सुधा सैरभैर पळू लागले होते.

बुलढाणा, 24 जुलै 2023 | जळगाव जामोद तालुक्यातील धरण फुटल्याची अफवा शहरासह तालुक्यात पसरली होती. कुणी म्हटले राजुरा धरण फुटले तर कुणी म्हटले कोरहाळा धारण फुटले आणि हे धरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केलीय होती. तर शहरातील नागरिक सुधा सैरभैर पळू लागले होते. दुकाने बंद झाली होती. प्रशासनाने सुद्धा खरंच काय आहे, म्हणून धरणाकडे धावा घेतली होती. मात्र असे काहीही झाले नसून धरण भरल्याने ते पाणी सांडव्यावरून बाहेर पडत होते. त्यानंतर, मात्र असे काहीही नसून धरण भरले होते. त्यातील शिल्लक पाणी सांडव्याच्या रुपाने बाहेर येत होते. धरणाच्या सांडव्याने बाजूला जागा केली. त्यातून पाणी बाहेर येत असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. तर या धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केलं.

Published on: Jul 24, 2023 07:39 AM