‘ज्यांच्यासाठी आंदोलन केलं त्यांनी साधा फोनही…’; सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर कुणी केलीय घणाघाती टीका
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात शरद पवार गटातील नेत्यांवर टीका केली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे
पुणे : 20 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासून आता अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने येत आहेत. एक मेकांवर आरोप-प्रत्योरोप केले जात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पक्ष बांधणीसाठी प्रत्यक्ष आता मैदानात उतरले आहेत. त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला असून राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा बीड येथे घेतली. तसेच जे बंडखोर आहेत त्यांच्यावर निशाना साधला. यावेळी अजित पवार गटातील नेत्यांवर शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी जोरदार निशाना साधला होता. त्याला पुण्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी चाकणकर यांनी अजित पवार यांच्या या बंडाचे समर्थन करताना, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टीका केली. २०१४ मध्ये ज्यांच्यासाठी आंदोलन केलं. 3 दिवस पोलीस कस्टडी लागली. त्यावेळी साधा फोन देखील त्यांनी घेतला नाही. पण जोपर्यंत जामीन होत नाही तोपर्यंत अजित पवार पाठपूरावा करत राहिले असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. तर रोहित पवारांवर थेट टीका करताना, काहीजण म्हणतात पक्षानं मोकळा श्वास घेतला एजंट बाहेर गेले. मग एवढे दिवस तुम्ही एजंटांसोबत काम करत होतात का? तेव्हा तुम्हाला सुचल नाही का? तर दादांवर टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.