‘गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच…,’ काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
अमोल कोल्हे स्वत: शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले होते त्यांनी निष्ठेच्या गोष्टी बोलू नयेत अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या पुण्यातील अधिवेशनात बोलत होत्या.
विधानसभेच्या निवडणूकांचा बार दिवाळीच्या आधीच उडणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठे यश मिळालेले आहे. त्यामुळे महायुती सरकारने मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजना या योजनेला मिळालेले यश पाहून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. भाजपाचे पुण्यात अधिवेशन सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष अजित पवार गटाचे अधिवेशनही पुण्यात सुरु आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शरसंधान केले आहे. अमोल कोल्हे यांनी दादांनी गुलाबी स्वप्नं पाहू नयेत असे म्हटले होते. यावर रुपाली चाकणकर यांनी त्यांना व्हॉट्सअपवर आलेला संदेश वाचून दाखविला. त्यात लाडकी बहीण योजनांवर टिका करणारे प्रत्यक्षात या योजनेचा आपल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर टिका करु नये. पिंपरी-चिंचवड परिसरात विदेशात असल्या सारखे वाटते. कारण येथील रस्ते आणि कारखाने हे सर्व दादांचे गुलाबी स्वप्नं आधीच पूर्ण झालेले आहे. लोकसभेत विरोधकांना मिळालेल्या जागा ही केवळ सूज असून विधानसभेत विरोधकांचे धाबे दणाणतील असेही चाकणकर यांनी यावेली म्हटले आहे.