मंत्रिमंडळात एकही महिलेचा सहभाग नसल्याचं दुर्देवं
पहिल्या टप्प्यात महिलांना स्थान मिळेल अशी आशा असतानाही शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना स्थान दिले नाही त्यामुळे महिला विरोधी सरकार आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजीतील द्रौपदी मुर्मू या विराजमान झाल्या, मात्र ज्या महाराष्ट्राने पुरोगामी विचाराचा वारसा साऱ्या जगाला आणि देशाला दिला त्या राज्याच्या मंत्रिमंडळात मात्र महिलांना स्थान देण्यात आले नसल्याने असे कोणतेही दुर्देवी नाही अशी टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे हे सरकार महिला विरोधी आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होत असताना पहिल्या टप्प्यात महिलांना स्थान मिळेल अशी आशा असतानाही शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना स्थान दिले नाही त्यामुळे महिला विरोधी सरकार आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Latest Videos