“संजय शिरसाट यांना क्लिनचीट; अहवाल मात्र आयोगाकडे आलेला नाही”, रुपाली चाकणकरांनी दिली माहिती
सुषमा अंधारेंनी पोलीस तक्रार दिली, तेव्हा त्याची नोंद कोणी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. राज्य महिला आयोगाकडे तक्रार आल्यानंतर संबंधित पोलीस विभागाला तपास करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
पुणे : “सुषमा अंधारेंनी पोलीस तक्रार दिली, तेव्हा त्याची नोंद कोणी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. राज्य महिला आयोगाकडे तक्रार आल्यानंतर संबंधित पोलीस विभागाला तपास करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलिसांचा अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला. या अहवालात तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भातील तपास करत असताना कायदेशीर अडचणी येत आहे. या तपासात सरकारी वकिलांची मदत घेऊन त्यांचा अभिप्राय घेऊन तपास करू. इतकंच अहवालातून सांगण्यात आलं आहे. संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाल्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला नाही”, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच “2024 मध्ये मी खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मागणार असल्याचंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. 2019 मध्येच मी उमेदवारी मागितली होती, मात्र त्यावेळी मला महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले. 2024 मध्ये अजित पवार आणि जयंत पाटील माझ्या नावाचा विचार करतील“, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.