राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? अजित पवार की शरद पवार? रुपाली पाटील काय म्हणाल्या?
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचं समीकरण बदललं आहे. दोन्हा गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला जात आहे. अशातच अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
पुणे : अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचं समीकरण बदललं आहे. दोन्हा गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला जात आहे. अशातच अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा आणि अजित पवार यांनी का बंड केला यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “काही विकास कामं थांबली होती. ती सुरळीत व्हावीत, यासाठी अजित पवार यांनी मित्रपक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. विरोधात असताना थांबलेली काम पूर्ण करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. गलिच्छ राजकारण स्वच्छ करण्यासाठी सत्तेत आलो आहोत. राजकारणात कोणीतरी विरोधात तर कोणीतरी सत्तेत असतात. सत्तेत गेलो. काही आमदार सत्तेत गेले. त्यामुळे शरद पवार साहेब नाराज आहेत. अजित पवार आणि शरद पवार बसून हा प्रश्न सोडवतील.विरोधात असताना संविधानिक पद्धतीने अजित पवार हे सत्तेत गेले आहेत. सरकारमधील लोकांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार आणि अजित पवार यांचा आहे.”