‘सत्तेत असतांना विदर्भावासीयांना काय दिले?’ ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर भाजप नेत्याची सडकून टीका
शिवसेना आणि त्यांनंतर आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे हे मैदानात उतरले आहे. तर त्यांनी आपल्या दौऱ्याला विदर्भातील यवतमाळमधून सुरूवात केली असून त्यांनी पोहरादेवी येथे सभा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
जामनेर : ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. शिवसेना आणि त्यांनंतर आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे हे मैदानात उतरले आहे. तर त्यांनी आपल्या दौऱ्याला विदर्भातील यवतमाळमधून सुरूवात केली असून त्यांनी पोहरादेवी येथे सभा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील हल्लाबोल केला. त्यावरून त्यांच्यावर भाजपकडून पलटवार केला जात आहे. यावेळी ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जोरदार टीका केली आहे. महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौरा म्हणजे नोटंकी असून देखावा असल्याचं म्हटलं आहे. तर ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीही विदर्भ दौरा केला नाही व कोणत्याही प्रकारची मदत विदर्भाच्या लोकांना केली? नसल्याचा घणाघात त्यांनी केला. त्याचबरोबर ठाकरे मुख्यमंत्री असतांना मातोश्रीची कधी पायरी उतरले नाही. कधी मंत्रालयात गेला नाहीत आणि आता तुम्ही सत्ता गेल्यानंतर विदर्भाचा दौरा करत आहात? असा सवाल केला आहे.