रशियाकडून युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, युरोप धोक्यात

रशियाकडून युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, युरोप धोक्यात

| Updated on: Mar 04, 2022 | 12:13 PM

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा (War) 9 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच असून, या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा (War) 9 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच असून, या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान आता रशियन सैनिक युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झिया एनपीपीला लक्ष करत असल्याचे युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी म्हटले आहे. रशियन सैन्य युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पोरिझ्झिया एनपीपीवर चारही बाजुने गोळीबार करत आहेत. रशियाच्या सैनिकांकडून युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरिझ्झियावर गोळीबार करण्यात आला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या प्रमुख सल्लागारांनी हा गोळीबाराचा व्हिडीओ ट्विट (twitter) केला आहे.

Published on: Mar 04, 2022 12:13 PM