VIDEO : अखेर ऋतुराज गायकवाडची पडली विकेट! क्रिकेटपटू उत्कर्षा पवार हिने केलं क्लिनबोल्ड, घेतलेही 7 फेरे
ऋतुराजने शनिवारी रात्री महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नाची गाठ बांधली. दोघांनी सात फेरे घेतले. ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या लग्नाचा विधी महाबळेश्वरमध्ये पार पडला. उत्कर्षासोबतच्या लग्नामुळे रुतुराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनललाही मुकावे लागले होते.
मुंबई : चेन्नईला चॅम्पियन बनवणारा स्फोटक सलामीवीर ऋतुराज गायकवाड अखेर विवाहबद्ध झाला. ऋतुराजने शनिवारी रात्री महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नाची गाठ बांधली. दोघांनी सात फेरे घेतले. ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या लग्नाचा विधी महाबळेश्वरमध्ये पार पडला. उत्कर्षासोबतच्या लग्नामुळे रुतुराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनललाही मुकावे लागले होते. याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला दिली होती. ऋतुराजने एका महिला क्रिकेटरशी लग्न केले आहे. दोघेही आयपीएल फायनलमध्ये एकत्र दिसले होते. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षा आणि ऋतुराजने महेंद्रसिंग धोनीचे पाय पडत आशीर्वादही घेतला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
