महाडिक गटाला धक्का, गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत सत्तांतर; सतेज पाटलांचा पुतण्या म्हणतो…
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आमदार सतेज पाटील गटाने महाडिक गटाला जोरदार धक्का दिला आहे. दक्षिण मतदारसंघातील सरपंचासह तीन ग्रामपंचायत सदस्यांनी आज महाडिक गटातून सतेज पाटील गटात प्रवेश केला, यामुळे गडमुडशिंगी ग्रामपंचायत सत्तांतर झालं असून एक ग्रामपंचायत सतेज गटाच्या ताब्यात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आमदार सतेज पाटील गटाने महाडिक गटाला जोरदार धक्का दिला आहे. दक्षिण मतदारसंघातील सरपंचासह तीन ग्रामपंचायत सदस्यांनी आज महाडिक गटातून सतेज पाटील गटात प्रवेश केला, यामुळे गडमुडशिंगी ग्रामपंचायत सत्तांतर झालं असून एक ग्रामपंचायत सतेज गटाच्या ताब्यात आली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील बहुतांशी गावांमध्ये आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आहे. मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडमुडशिंगी गावात महाडिक गटांने आपली सत्ता कायम ठेवली होती.आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना गडमुडशिंगीसारख्या मोठी ग्रामपंचायत सतेज पाटील गटाच्या ताब्यात आल्याने पाटील गटाला मोठं बळ मिळालं आहे.आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर विश्वास ठेवून लोक आपल्याकडे येत असल्याचं यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटलं. दरम्यान दक्षिण मतदार संघात जलजीवन मिशन कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत, याबद्दल विचारला असता “स्थानिक राजकारणातून अशा चांगल्या प्रकल्पांनाही विरोध करत आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही कामे पूर्ण करणारच”, असं देखील ऋतुराज पाटील यांनी म्हटलं आहे.