नुकताच मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. जुन्या मंत्र्यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून नव्या दमाच्या नेत्यांच्या मंत्रिपदाची इनिंग खेळण्याची संधी दिली. यात प्रीतम मुंडे याचंही नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. याच पार्श्वभूमीवर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहे. आजच्या सामना अग्रलेखातून तर कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा करण्यात आलाय. (Saamana Editorial Comment on Bhagwat karad And Pankaja Munde Ministry Expansion)
भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.