विधान परिषदेचा निकाल ही तर सुरुवात, भाजप-मिंधेगटाला बरंच पचवायचंय; सामनातून टीकास्त्र

विधान परिषदेचा निकाल ही तर सुरुवात, भाजप-मिंधेगटाला बरंच पचवायचंय; सामनातून टीकास्त्र

| Updated on: Feb 04, 2023 | 9:27 AM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विधानपरिषदेच्या निकालावर भाष्य करण्यात आलं आहे. यावेळी भाजप आणि शिंदेगटावर टीका करण्यात आली आहे. पाहा...

सामनाच्या अग्रलेखातून आजच्या विधानपरिषदेच्या निकालावर भाष्य करण्यात आलं आहे. यावेळी भाजप आणि शिंदेगटावर टीका करण्यात आली आहे. “पदवीधर व शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपची मक्तेदारी राहिलेली नाही व विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला. पुन्हा उपमुख्यमंत्री फडणवीसांचे राजकीय वर्चस्व. तरीही भाजप पराभूत होतो. हाती सत्ता, पोलीस, पैशाचे बळ असूनही पदवीधर-शिक्षक बधले नाहीत व त्यांनी भाजपचा पचकाच केला. पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचे आहेत. ही तर सुरुवात आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Published on: Feb 04, 2023 08:14 AM