‘ती’ याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने भाजपला चपराक लगावलीये; सामनातून टीकास्त्र
Saamana Editorial : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ दिला आहे. पाहा...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. “भारतीय जनता पक्षाचे राजकारण आणि सत्ताकारण ज्या धार्मिक उन्मादाच्या कुबडीवर उभे आहे, त्या कुबडीलाच धक्का देणारी आणि त्यापेक्षा देशासमोर इतर अनेक गंभीर समस्या आहेत याची जाणीव करून देणारी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली आहे.परकीय आक्रमकांनी बदललेली ऐतिहासिक स्थळांची मूळ नावे परत देण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार कानउघाडणी केली. सत्तेसाठी देशात दुहीची बीजे पेरण्याचा शॉर्टकर्ट निवडणाऱ्या सत्तापक्षाच्या कानात या सर्वोच्च कानपिळीचा अर्थ शिरेल काय?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
Published on: Mar 01, 2023 10:57 AM
Latest Videos