सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता, पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अंधश्रद्धाळू निघाले; सामनातून टीकास्त्र

सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता, पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अंधश्रद्धाळू निघाले; सामनातून टीकास्त्र

| Updated on: Apr 09, 2023 | 9:27 AM

Saamana Editorial : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सावरकरांच्या विचारांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला. कारण विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धा, भोंदुगिरी, जादुटोणा यामागे जनता लागली. भाजपने ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली. सावरकरांचा विचार विज्ञानवादीच होता. त्या विज्ञानवादाला मूठमाती देऊन ‘मोदी पक्ष’ पुन्हा देशाला अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विहिरीत ढकलत आहे. अशाने देश गुलामच होईल, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीन पूर्ण घुसले आहे. अरुणाचल प्रदेशातील 11 मोठ्या गावांवर चीनने पुन्हा दावा सांगितला व गावांची नावे बदलून ती चिनी भाषेत केली. त्या 11 गावांत घुसून भाजपने एखादे मंदिर बांधावे, अशी मागणी या भोंदू धर्मवीरांनी का करू नये?, असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

Published on: Apr 09, 2023 09:26 AM