भगतसिंग कोश्यारी नरेंद्र मोदींच्या ‘गोल्डन गँग ‘चे सदस्य; सामनातून हल्लाबोल
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पाहा काय म्हणण्यात आलं आहे...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “पंतप्रधान श्री. मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ”मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं .” हे काही खरे नाही . विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप , विंचू , मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत . महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते , तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘ गोल्डन गँग ‘ चे सदस्य होते . या ‘ गोल्डन गँग ‘ च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही . राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती . महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा उगाळावा लागला . कारण चंदन उगाळण्याचे दिवस संपवले गेले आहेत”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.