प्रिय पंतप्रधान, देश कोण विकत आहे?; सामनातून संजय राऊत यांचा नरेंद्र मोदी यांना रोखठोक सवाल
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. प्रिय पंतप्रधान, देश कोण विकत आहे?, असा सवाल त्यांनी केलाय. पाहा...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाचं कौतुक केलंय. “मोदी अदानी युतीवर राहुल गांधी यांनी संसदेत तोफखानाच सोडला. सरकारी खासदारांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणले, पण मोदी संसदेत येऊन उडवाउडवीचे व सर्व अवांतर बोलले. राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पलायन केले. त्यात पी. एम. केअर्स फंडाचे प्रकरण उसळून वर आले. देश विकला जात आहे!”
Published on: Feb 12, 2023 09:20 AM
Latest Videos