पंतप्रधान मोदी-शरद पवार एकाच मंचावर, “देवा, दगडूशेठ गणराया, तूच…”; सामनातून निशाणा
पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे.
मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 01, 2023 09:24 AM
Latest Videos