शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं, सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

“शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं”, सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

| Updated on: Jun 27, 2023 | 3:26 PM

24 जूनला मुंबईत पहिला पाऊस आला आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. या मुद्द्यावरून आजच्या सामनातून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबई : 24 जूनला मुंबईत पहिला पाऊस आला आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. या मुद्द्यावरून आजच्या सामना या वृत्तपत्रातून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे . या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल , हे सांगता येणे कठीण आहे . कारण फक्त वल्गना , घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही . पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘ पावसाचे स्वागत करा , तक्रारी काय करता ?’ असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत . हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका !,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 

Published on: Jun 27, 2023 03:26 PM