‘महागाईवर ‘मौनीबाबा’ बनून राहायचं’, वाढत्या महागाईवरून ‘सामना’तून केंद्र सरकारवर काय निशाणा?

| Updated on: Aug 09, 2023 | 9:17 AM

VIDEO | 'महागाईचा भार अन् त्यात टंचाईचा मार! अशा कोंडीत देशातील जनता, पण केंद्राला फिकीर कुठे?', वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून सामनतून केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ | देशात सध्या सर्वच प्रकारच्या महागाईने टोक गाठलंय, असे म्हणत वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून सामनतून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. धान्य, डाळी आणि साखरेच्या टंचाईच्या भितीची भर तर या परिस्थितीची मोदी सरकारला कितीपण जाणीव आहे, असा सवाल उपस्थित करत भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे मौनीबाबा बनून राहायचे आणि सरकार फक्त विरोधी पक्षांच्या फोडाफोडीत अन् राजकारणात मग्न असल्याचे म्हणत सामना मधून केंद्र सरकारला खोचक टोला लगावण्यात आलाय.

‘अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे आणि साखरेसह इतर उत्पादनातील तुटीची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य जनतेला कमीत कमी कशी बसेल याचा मार्ग केंद्रातील सरकारने काढायचा असतो. मात्र नेमके येथेच घोडे पेंड खाते आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायची आणि भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे ‘मौनीबाबा’ बनून राहायचे. आधीच महागाईचा भार त्यात साखर, धान्य आणि डाळींच्या टंचाईचा मार अशा कोंडीत देशातील जनता सापडण्याची भीती आहे. अर्थात केंद्रातील सत्तापक्षाला त्याची फिकीर कुठे?’, असा थेट सवाल केंद्राला उपस्थित करण्यात आलाय.

Published on: Aug 09, 2023 09:17 AM
“राष्ट्रवादीत आलबेल म्हणजे शरद पवार यांचा अजितदादा आणि महायुतीला पाठिंबा”; भाजप नेत्याचं मोठं विधान
पालघरमध्ये अंधश्रद्धेचा विस्फोट; सर्पदंश झालेल्या इसमावर उपचार सुरू असतानाच अघोरी विद्याचा वापर