विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाचा नेता स्पष्टच बोलला...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाचा नेता स्पष्टच बोलला…

| Updated on: Jul 17, 2023 | 2:28 PM

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक होताना दिसले. मात्र यावेळी शरद पवार गटाचे नेते आणि समर्थक उपस्थित नव्हते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई, 17 जुलै 2023 | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक होताना दिसले. यावेळी विरोधकांनी “घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो” असे पोस्टर घेऊन आंदोलन केले आहे. तसेच “सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली”, “खोके गेले, बोके गेले; सरकारमध्ये ओक्के झाले” अशी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र यावेळी शरद पवार गटाचे नेते आणि समर्थक उपस्थित नव्हते. शरद पवार गटाच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सचिन अहिर नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ पाहा…

Published on: Jul 17, 2023 02:28 PM