Sachin Ahir on Ashish Shelar : एवढीच हौस असेल तर वरळीतून लढून बघा, सचिन अहिरांचं आशिष शेलार यांना थेट आव्हान
शिवसेना नेते सचिन अहिरांनी (Sachin Ahir) पलटवार केला. यावेळी सचिन अहिर यांनी म्हटलंय की, एवढीच तुम्हाला हौस असेल तर वरळीमधून लढा, असा पलटवार सचिन अहिर यांनी आमदार आशिष शेलारांवर केला आहे.
मुंबई : आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) ट्विट करून डिवचलं आणि यावर लगेच पलटवार शिवसेनेकडून करण्यात आलाय. शिवसेना नेते सचिन अहिरांनी (Sachin Ahir) पलटवार केला. यावेळी सचिन अहिर यांनी म्हटलंय की, एवढीच तुम्हाला हौस असेल तर वरळीमधून लढा, असा पलटवार सचिन अहिर यांनी आमदार आशिष शेलारांवर केला आहे. दरम्यान, आशिष शेलार यांनी काय ट्विट केलं होतं ते पाहुया, ‘ज्या वरळीत सेनेच्या (?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला “बळ” अपुरे पडतेय. दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड. आमचा गड म्हणून मिरवायचे. आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत. लवकरच. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय!!,’ असं ट्विट शेलार यांनी केलं होतं.