राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; महाविकास आघाडीवर परिणाम होणार? ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
Sachin Ahir on NCP : राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. यावर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयावर संशय निर्माण होतोय. अनेक वर्ष निर्णय प्रलंबित असतात. आता निर्णय लवकर दिला जातोय. पण यात कुणावर अन्याय होता कामा नये. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की सर्वांना न्याय द्यावा. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निर्धार केला पाहिजे. महाविकास आघाडीला फटका बसणार नाही. न्यायालय घटनेचा भाग असला तरी जनतेचा न्यायालय मोठा आहे”, असं सचिन अहिर म्हणाले आहेत. सचिन अहिर पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 11, 2023 10:19 AM
Latest Videos