हे सरकार भाजपचच….
पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारच्या काळात मंत्रिपदाचे वाटप करताना योग्य विचार करूनच त्यांनी खातेवाटप केले होते, तर आता मात्र तसे दिसत नाही.
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी त्यामध्ये महत्वाची आणि अतिमहत्वाची खाती ही भाजपकडे आपल्याकडे ठेवली आहेत तर काही तोंडाला पानं पुसण्याची काम शिंदे गटाला फडणवीसांकडून करण्यात आल्याचे टीका सचिन आहिर यांनी व्यक्त केली. यावे ळी त्यांनी सांगितले की, गेल्या सरकारमध्येम ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना ठाकरे सरकारच्या काळात मानाची पदं होती, मात्र आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने खातेवाटप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केले. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारच्या काळात मंत्रिपदाचे वाटप करताना योग्य विचार करूनच त्यांनी खातेवाटप केले होते, तर आता मात्र तसे दिसत नाही.
Published on: Aug 15, 2022 02:46 PM
Latest Videos