निळू फुले यांना आठवा अन् आप्पासाहेब धर्माधिकारीजी तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करा

“निळू फुले यांना आठवा अन् आप्पासाहेब धर्माधिकारीजी तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करा”

| Updated on: Apr 20, 2023 | 12:35 PM

"महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार यंदा जाणीवपूर्वक आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला परंतु पुरस्कार प्रदान करताना उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला हे अत्यंत निंदनीय आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करा", असं सचिन खरात म्हणाले आहेत.

मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उष्माघातामुळे श्रीसेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर रिपाइंचे नेते सचिन खरात यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार परत करण्याचं आवाहन केलं आहे. “आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही आठवण करून देत आहे की ज्यावेळेस ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून सांगितले होते की आपल्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी आपली निवड केली आहे त्यावेळेस अभिनेते निळू फुले मुख्यमंत्र्यांना म्हणाले मी या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणत्याही पराक्रम केला नाही उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो आणि माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही उलट अशा माणसाला पुरस्कार द्यावा जो समाजासाठी काम करतो याची आठवण ठेवून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा”, असं सचिन खरात म्हणाले आहेत.

Published on: Apr 20, 2023 12:35 PM