अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यांचा निर्णय योग्य; सचिन खरात यांचा अजित पवार यांना पाठिंबा

“अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यांचा निर्णय योग्य”; सचिन खरात यांचा अजित पवार यांना पाठिंबा

| Updated on: Jul 06, 2023 | 10:27 AM

अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. बहुतांश आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्याकडे 40हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी सचिन खरात यांनी “आम्ही अजित पवार यांच्या पाठिशी आहोत. अजित पवार यांनी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री व्हावं,” अशी इच्छा बोलून दाखवली.

Published on: Jul 06, 2023 10:27 AM