सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ, प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण

सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ, प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Nov 03, 2024 | 3:48 PM

माहिम विधानसभा मतदार संघातून राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणूक लढवित आहेत. मात्र, महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी देखील येथून अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुतीतच बंडखोरी झालेली आहे.

राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे माहिम मतदार संघातून विधानसभा निवडणकीला उभे आहेत. मात्र, या मतदार संघातून सदा सरवणकर यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. सदा सरवणकर यांनी आपला अर्ज मागे घेण्यास नकार देत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे महायुतीत बंडखोरी झाली आहे. या संदर्भात भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपाने मन मोठं करायला हवे आहे. तो आपला घरातील मुलगा आहे. तसेच तो राज ठाकरे यांचा मुलगा आहे. तो प्रथमच निवडणूकीला उभा राहीला आहे. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी भाजपाची आहे. आम्ही सदा सरवणकर यांची समजूत काढू त्यांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर घेतले आहे. त्यांना आता विधानपरिषदेची आमदारीची संधी देऊ असेही भाजपाचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 03, 2024 03:48 PM